जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त वस्तूंची त्यांच्या वैशिष्ट्याबाबत
एकमेकांमध्ये तुलना करावयाची असते, तेव्हा आपण 'तर-तम भाव' वापरतो. त्यालाच Degree
of Comparison असे म्हणतात.
थोडक्यात विशेषण किंवा क्रिया विशेषण यांच्या तौलनिक अभ्यासाला
Degree of Comparison असे म्हणतात.
eg:
a) Gopal
is as good as Krishna.
b) Manipal
is better than Gopal.
c) Vishal
is the best boy of all.
टीप:
a) good, better, best हि good या विशेषणाची तीन रूपे आहेत. अशा प्रकारे तीन
रूपांच्या वापर करण्याच्या पद्धतीस आपण Degree असे म्हणतो.
b)Degrees of Comparison ला थोडक्यात Degreeअसे म्हणतात.
c)तुलना करताना आपण विशेषण किंवा क्रिया विशेषण यांच्या तीन रूपांचा
वापर करतो.
·
*
Degree of Comparison चे प्रकार:
१)Positive Degree: समान्य भावदर्शक विशेषण/ क्रिया विशेषण:
विधान मध्ये विशेषणाचा/ क्रिया विशेषणाचा वापर करून सामान्य स्थिती
सांगितलेली असेल. तर ते वाक्य Positive Degree मध्ये आहे असे म्हणतात.
eg:
a) Seeta
is as tall as yamuna.
b) No
other boy is as good as gopal.
c) Very
few boys are as clever as vishal.
टीप:
a)Positive Degree मध्ये विशेषणाची किंवा क्रिया विशेषणाची सामान्य
स्थिती सांगितलेली असते.विशेषणाच्या किंवा क्रिया विशेषणाच्या पहिल्या रूपाच्या दोन्ही
बाजूस होकारार्थी वाक्यात as .....as आणि नकारार्थी
वाक्यात so .....as वापरतात.
eg:
a) Ramnath
is as rich as somnath.( होकारार्थी)
b) Vishwanath
is not so rich as somnath. (नकारार्थी)
2)Comparative Degree: तर भावदर्शक विशेषण/ क्रिया विशेषण:
विशेषण/ क्रिया विशेषण यांचे वर्णन 'च्यापेक्षा जास्त' अशी स्थिती
दाखविण्यासाठी केलेले असते, तेव्हा ते वाक्य Comparative Degree मध्ये आहे असे म्हणतात.
eg:
a) Yasmeen
isn’t taller than seeta.
b) Gopal
is better than any other boy.
c) Vishal
is cleverer than most other boys.
टीप:
a)Comparative Degreeमध्ये
विशेषणाचे/ क्रिया विशेषणाचे दुसरे रूप वापरलेले असते.
b)विशेषणाच्या किंवा क्रिया विशेषणाच्या दुसर्या रुपानंतर than हे
शब्दयोगी अव्यय वापरतात.
3)Superlative Degree:तम
भाववाचक विशेषण/ क्रिया विशेषण:
विशेषण किंवा क्रिया विशेषण यांचे वर्णन "सर्वात श्रेष्ठ
" अशी स्थिती दाखविण्यासाठी केलेले असते, तेव्हा ते वाक्य Superlative Degree
मध्ये आहे असे म्हणतात.
eg:
a) Kolkata
is the largest city of all.
b) Mumbai
is one of the largest cities.
टीप:
a)Superlative Degree मध्ये
विशेषणाचे/ क्रिया विशेषणाचे तिसरे रूप वापरलेले
असते.
b)तिसऱ्या रूपा पूर्वी the हे उपपद वापरतात.
· *
Degree बदलण्याचे नियम:
Ø
Positive Degree: Kavita is as beautiful
as savita.
Ø
Comparative Degree; Savita isn’t more
beautiful than kaita.
Ø
Superlative Degree मध्ये
होत नाही
टीप:
a)Positive Degree मध्ये एका वस्तूची एका वास्तूशी तुलना केली असेल,
तर तिचे रुपांतर Superlative Degree मध्ये होत नाही.
b)Beautiful हे विशेषणाचे पहिले रूप आहे.त्यचे दुसरे रूप er प्रत्यय
जोडून होत नाही.अशा विशेषणाचे दुसरे रूप करताना त्यापूर्वी more चा वापर करतात.
Ø
Comparative Degree: shankar is wiser
than mohan.
Ø
Positive Degree:Mohan isn’t so wise as
shankar.
टीप:
a) Comparative Degree एका वस्तूची एका वास्तूशी तुलना केली
असेल,तर तिचे रुपांतर Superlative Degree मध्ये होत नाही.
b)Comparative Degree होकारार्थी
असेल तर Positive Degree नकारार्थी असते, आणि Comparative Degree नकारार्थी असेल तर Positive Degree होकारार्थी
असते.
Ø
Positive Degree:No other boy is as good
as gopal
Ø
Comparative Degree:Gopal is better than
any other boy.
Ø
Superlative Degree: Gopal is the best
boy of all.
टीप:
a) Positive Degree मध्ये अनेकांची तुलना एकाशी केलेली असेल तर तिचे रुपांतर Comparative Degree व Superlative Degree
मध्ये करतात येते.
b)Positive Degree मध्ये वाक्याच्या सुरवातीस No other असेल, तर
Comparative Degreeमध्ये No other चा लोप करून than नंतर any other चा वापर करतात.
c)Positve Degree मध्ये
वाक्याच्या सुरवातीस No other असेल, तर Superlative Degree मध्ये No other चा
लोप करून शेवटी of all चा वापर करतात.
d)Positive Degree पासून Comparative Degree बनविताना कर्ता व कर्म
यांच्या जागेची अदलाबदल होते
e)Positive Degree पासून Superlative Degreeबनविताना कर्ता व कर्म
यांच्या जागेची अदलाबदल होते.
Ø
POSITIVE DEGREE: Very few farmers are as
rich as ramnath.
Ø
Comparative Degree: Ramnath is richer
than many other farmers.
Ø
Superlative Degree: Ramnath is one of
the richest farmers.
टीप:
a) Positve Degree मध्ये वाक्याच्या सुरुवातीस very few चा वापर
केलेला असेल, तर Comparative Degree मध्ये
very few चा लोप करून than नंतर many other /most
other चा वापर करतात.
b)Positive Degree मध्ये वाक्याच्या सुरवातीस very few चा वापर केलेला असेल, तर Superlative Degree मध्ये
very few चा लोप करून क्रीयापादानंतर one of चा वापर करतात.